स्वच्छ सुंदर प्रदूषणमुक्त… वेगवान मुंबई, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी युतीचे ध्येय!

मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि वेगवान बनवण्यासाठी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादीच्या युतीने विकासाचे ध्येय ठेवले आहे. विकसित मुंबईसाठीचा आराखडाच आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि ‘मनसे’ नेते अमित ठाकरे यांनी उमेदवारांसमोर मांडला. यामध्ये परवडणारा प्रवास, स्वच्छ व स्वस्त पाणी, शिक्षणाच्या सुविधा, सुरक्षितता, स्वयंरोजगार, दर्जेदार रस्ते आणि मुंबईकरांच्या अनेक अद्ययावत सुविधा देण्याचे ध्येयच या सादरीकरणातून मांडण्यात आले.

सोसायटय़ांना इको-फ्रेंडली सुविधांसाठी एक लाखाची सबसिडी, कचरा संकलनासाठी प्रस्तावित अदानी कर रद्द करणार.

नव्या पुनर्विकसित इमारतींमध्ये प्रत्येक फ्लॅटला पार्किंग सुविधा देणे बंधनकारक.

मुंबईचा कोस्टल रोड आणि पूर्व किनारपट्टी यांना जोडणाऱ्या रस्त्यांचं जाळं निर्माण करून मुंबईभोवती मास रॅपिड मोबिलिटीसाठी रिंगरोड ग्रिड उभारणार.

मुंबईतील सध्याचे विकास प्रकल्प निश्चित कालावधीत पूर्ण करून अनावश्यक कंत्राटदारप्रेमींचे खोदकाम काम रोखणार.

पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये बेस्ट विद्युतच्या विस्तारीकरणासाठी विशेष योजना आखणार.

पाळीव पशूंसाठी पेट पार्क, पेट क्लिनिक, पेट ऍम्ब्युलन्स आणि पेट क्रेमॅटोरीयम.

खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास

तिकीट दरवाढ कमी करून रु. 5-10-15-20 फ्लट रट ठेवणार.

बेस्टच्या ताफ्यात 10,000 ईलेक्ट्रिक बसेस

-900 डबल-डेकर ईलेक्ट्रिक बसेस

जुने मार्ग पुन्हा सुरू करणार

महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास.

ज्युनिअर कॉलेज, डॉ. आंबेडकर गंथसंग्रहालय

डॉ. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथसंग्रहालय.

दहावीनंतरची गळती रोखण्यासाठी शाळांमध्ये बारावीपर्यंतचे ज्युनिअर कॉलेज.

सर्व माध्यमांच्या शाळांत ‘बोलतो मराठी’ उपक्रम राबवणार.

आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य, पालिकेचं स्वतःचं कॅन्सर रुग्णालय

पालिका रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये रुग्णांना जेनेरिक औषधे मोफत.

ज्येष्ठ नागरिकांसाठी 24X7 हेल्थ-केअर कंट्रोल रूम आणि हेल्थ-टू-होम सेवा.

महापालिकेची स्वतःची रुग्णवाहिका सेवा सुरू करणार.

मुंबई महापालिकेचं स्वतःचं कॅन्सर रुग्णालय असेल.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वयंरोजगार अर्थसाहय़ योजना

एक लाख तरुण-तरुणींना प्रत्येकी 25 हजार ते 1 लाख रुपयांचा स्वयंरोजगार सहाय्यता निधी तसंच 25 हजार गिग वर्कर्सना आणि डबेवाल्यांना ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज.

विधानसभेत पाळणाघर

मुंबईतील आमच्या भगिनींच्या लहान मुलांसाठी उत्कृष्ट दर्जाची पाळणाघरे उभी करू.

मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर दर 2 किलोमीटरला एक अशी महिलांसाठी उत्तम स्वच्छता असलेली शौचालये बांधली जातील.

प्रत्येकाला पाणी

डिसॅलिनेशन प्रकल्प उभारणार. एसटीपी प्रकल्प वेळेत पूर्ण करणार. नवीन इमारतींमध्ये rainwater percolation pits आणि मुंबईत मागेल त्या प्रत्येकाला स्वच्छ आणि स्वस्त पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुंबईची जमीन मुंबईकरांच्या घरांसाठीच

महापालिकेच्या मालकीच्या जमिनी खासगी विकासकांच्या घशात न घालता तिथे मुंबईकरांची सेवा करणाऱ्या शासकीय, महापालिका, बेस्ट आणि पोलीस कर्मचाऱ्यांना तसंच गिरणी कामगारांना हक्काची घरं देणार.

मुंबई महापालिकेचं स्वतःचं गृहनिर्माण प्राधिकरण असेल.

पुढील 5 वर्षांत 1 लाख मुंबईकरांना परवडणारी हक्काची घरं दिली जातील.

फूटपाथ आणि मोकळय़ा जागा

रस्त्यांइतकेच फूटपाथही महत्त्वाचे आहेत, “Pedestrian First” धोरणाची अंमल बजावणी करून फुटपाथ पेव्हर ब्लॉक-फ्री आणि दिव्यांग-स्नेही करणार.

शब्दांचा खेळ करून मुंबईतील मोकळय़ा जागा आणि विशेषतः महालक्ष्मी रेसकोर्स, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आर जगल आणि अन्य मोकळय़ा जमिनी कोणत्याही परिस्थितीत बिल्डरांना आंदण दिल्या जाणार नाही.

मोकळा श्वास

गेल्या तीन वर्षांत कमालीचे वाढलेले प्रदूषण तातडीने कमी करण्यासाठी मुंबई पर्यावरण कृती आराखडय़ाची कठोर अंमलबजावणी करणार.

हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई बांधकाम पर्यावरणीय व्यवस्थापन (एमसीईपी) योजना अमलात आणणार.

अनियंत्रित विकासामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे जंगल तसेच मुंबईतील कांदळवनं आणि वृक्षसंपदा उद्ध्वस्त होऊ देणार नाही.

आंतरराष्ट्रीय उद्योजकता आणि वित्तीय केंद्र तसेच सागरी पर्यटन केंद्र

बीपीटीच्या सुमारे 1,800 एकरच्या जमिनीवर आंतरराष्ट्रीय उद्योजकता आणि वित्तीय केंद्र तसेच सागरी पर्यटन केंद्र उभारणार. भाजपच्या काळात मुंबईतून

गुजरातला पळवलेले आर्थिक, वित्तीय केंद्र मुंबईत पुनःस्थापित करणार. ऑलिम्पिक दर्जाची स्पोर्टस् सिटी उभारणार. इथल्या स्थानिक नागरिकांचे जिथल्या तिथेच पुनर्वसन करणार आणि मुंबईकरांना मोकळय़ा जागा उपलब्ध करणार.