आरएसएसला भाजपच्या चष्म्यातून बघणे चुकीचे, सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही प्रतिक्रियावादी किंवा विरोधासाठी जन्माला आलेली संघटना नाही. त्यामुळे भाजपकडे बघून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समजून घेणे ही मोठी चूक ठरेल,’ असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. भोपाळ येथे ते बोलत होते. आम्ही विशिष्ट पोशाख घालतो. संचलन करतो आणि लाठी सराव करतो. म्हणून कोणी आम्हाला निमलष्करी संघटना म्हणत असेल तर तेही चुकीचे आहे. संघ ही स्वतंत्र संघटना आहे, असे ते म्हणाले.