महेश गोळे यांची हकालपट्टी

पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे प्रभाग क्रमांक 113 मधील महेश गोळे यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.