तरुणांची उद्योजकता, नेतृत्वाचा रोड मॅप; जय हिंद कॉलेजमध्ये 16,17 जानेवारीला ग्लोबल आंत्रप्युन्योरशिप समिट

तरुणांना उद्योजकतेकडे आकर्षित करून त्यांच्या नवनवीन कल्पनांना वास्तवात आणण्याची ऊर्जा देण्यासाठी जय हिंद महाविद्यालयात दहावे ग्लोबल आंत्रप्युन्योरशिप समिटचे 16 आणि 17 जानेवारी रोजी आयोजन केले आहे. या समिटमध्ये कीनोट सत्रे, पॅनल चर्चा, कार्यशाळा, नेटवक्रिंग यावर मार्गदर्शन केले जाईल.

ग्लोबल आंत्रप्युन्योरशिप समिटचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘स्टार्टअप स्पर्धा’, ज्यामध्ये नवोदित उद्योजक आपले व्यवसाय मॉडेल आणि कल्पना तज्ञ परीक्षकांसमोर सादर करतात. यंदा स्टार्टअप स्पर्धेसाठी 170 हून अधिक स्टार्टअप्सची नोंदणी केली आहे.

समिटमधील प्रमुख वक्त्यांमध्ये चीफ आर अॅण्ड डी ऑफिसर अनुभव सक्सेना, रुस्तमजीचे सीईओ मनीष रांदेव, वंडरचीफचे फाऊंडर अॅण्ड सीईओ रवी सक्सेना आणि मेटो ब्रँडचे सीईओ निसान जोसेफ  यांचा समावेश आहे. या संमेलनाला जय हिंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय दाभोलकर आणि एआयसीटीई कोर्सेसच्या संचालिका डॉ. राखी शर्मा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कोअर टीममध्ये निकोले गुहा, निर आवास्कर, सोहम विभुते, सियान माकवाने, भूमिका डिंगरेजा, यशस्वी रावतानी, दिती खत्री, अबिगेल अल्बर्टो आणि नम्रता तलरेजा हे आहेत.