
बनावट सोने देऊन नवीन दागिने घेऊन पळून गेलेल्या दोन महिलांना दहिसर पोलिसांनी अटक केली. लक्ष्मी विराज्ज्न आणि नागमणी विराज्ज्न अशी दोघींची नावे आहेत. तक्रारदाराच्या दुकानात दोन महिला आल्या. त्या दोघींनी जुने दागिने देऊन नवीन दागिने खरेदी करायचे असल्याचे सांगितले. त्या दागिन्यांच्या मोबदल्यात त्यानी साडेनऊ लाखांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने घेतले होते. तसेच उर्वरित एक लाख रुपये त्यानी रोख स्वरूपात घेतले. दुसऱया दिवशी दुकानाचे मालक आले. त्यानी ते दागिने पाहिले. तेव्हा त्याना ते दागिने बनावट असल्याचे लक्षात आले.
























































