
1- काहीवेळा व्हॉट्सअॅपवर एखाद्या अनोळख्या नंबरवरून मेसेज येतो. त्या मेसेजवर चुकून आपल्याकडून क्लिक होऊ शकते आणि आपले आर्थिक नुकसान होऊ शकते.
2 – व्हॉट्सअॅपवर अनोळखी नंबरवरून फाईल आल्यास ती उघडू नका. कारण त्यात मालवेअर (Malware) असू शकतो. त्या नंबरला ब्लॉक करा, रिपोर्ट करा.
3 – जर फाईल किंवा लिंक संशयास्पद वाटली तर त्यावर टॅप करू नका, फॉरवर्ड करू नका आणि अज्ञात नंबरच्या व्यक्तीशी वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती शेअर करू नका.
4 – तुमच्या फोनची गोपनीयता सेटिंग्ज तपासा आणि मीडिया ऑटो-डाऊनलोड बंद करा, जेणेकरून अनोळखी फाईल्स आपोआप सेव्ह होणार नाहीत.
5 – अनोळखी फाईल्समध्ये मालवेअर असू शकतो जो तुमचा फोन हॅक करून तुमचा डेटा चोरू शकतो. स्पॅमर अनेकदा अशा फाइल्स पाठवून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात.
































































