
घरातील चांदीची भांडी किंवा देवपूजेतील चांदीचे साहित्य काही दिवसांमध्ये काळी पडतात. अनेकदा कितीही घासली तरीही त्यांना चमक येत नाही. त्यामुळे महागडे पॉलिश वापरण्याऐवजी ही जुनी ट्रीक वापरल्यास काही मिनिटांमध्येच चांदी स्वच्छ होऊन चमकायला लागेल.
n चांदी स्वच्छ करण्यासाठी पूर्वी ताकाचा वापर व्हायचा. चांदीची भांडी किंवा वस्तू साधारणतः अर्धा तास ताकात भिजवून ठेवा. त्यानंतर ती पाण्याने धुऊन पुसून घ्या.
n याशिवाय लिंबाच्या रसात मीठ मिसळून ते मिश्रण घासल्यास चांदी चमकू लागते. टूथपेस्ट घासल्यानेही चांदी स्वच्छ होते.
























































