
चेन्नईतील सफाई कर्मचारी पद्मा यांनी रस्त्यावर पडलेले तब्बल 45 लाख रुपयांचे दागिते परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले. याबद्दल पद्मा यांना मुख्यमंत्र्यांनी सन्मानित केले. चेन्नईतील सफाई कर्मचारी पद्मा नेहमीप्रमाणे चेन्नईच्या गजबजलेल्या ‘ टी नगर’ भागात पद्मा झाडू मारत होत्या. कचरा साफ करता करता त्यांची नजर रस्त्याकडेला पडलेल्या एका पिशवीवर पडली. कुतूहलापोटी त्यांनी पिशवी उघडून पाहिली आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पिशवीत सोन्याचे हार, बांगड्या आणि सोन्याची बिस्किटे लखलखत होती. सुमारे 45 तोळे वजनाचे हे दागिने असून त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत 45 लाख रुपये आहे.
























































