Ladakh Earthquake – लेह लडाखमध्ये भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर 5.7 तीव्रतेची नोंद

लडाखच्या लेह भागात सोमवारी सकाळी भूकंपाचा धक्का बसला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS) नुसार, सकाळी 11 वाजून 51 मिनिटांनी 5.7 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 171 किलोमीटर खोल होते. यात जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

दिल्लीतही सोमवारी सकाळी 8 वाजून 44 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.8 होती. भूकंपाचे केंद्र उत्तर दिल्लीत होते. भूकंपाची खोली जमिनीपासून फक्त 5 किलोमीटर होती.