
हिवाळ्यामध्ये आपल्या आहारामध्ये कोणते पदार्थ समाविष्ट करायला हवेत, याबाबत खूप सजग राहायला हवे. हिवाळ्यात आपली शारीरिक हालचाल मंदावते. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही बदल होतो. हिवाळ्यात वजनवाढण्यास सुरुवात होते. या अशा परिस्थितीमध्ये पालक आणि मेथीचे सूप एक उत्कृष्ट पर्याय मानला जातो. पालक आणि मेथीचे सूप हे लोह आणि फायबरने समृद्ध असते. तसेच या सूपमध्ये कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळेच हे सूप हिवाळ्यात खूप पौष्टीक मानले जाते.
आरोग्य तज्ञांच्या मते, हिवाळ्यात पालक-मेथीचा सूप पिणे हा वजन कमी करण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. पालक आणि मेथी दोन्ही फायबरचे पॉवरहाऊस आहेत. फायबर केवळ आपले पचन सुधारत नाही तर, या भाज्या खाल्ल्यामुळे आपले पोट अधिक काळ भरलेले राहते. पालक मध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, तर मेथी शरीरात इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारते.
पालक मेथीचे सूप हिवाळ्यात पिण्याचे म्हणूनच भरमसाठ फायदे आहेत. या सूपमध्ये मुबलक प्रमाणात लोह, जीवनसत्त्वे अ, क आणि के तसेच पोटॅशियम असते. मेथीमध्ये आढळणारे गॅलेक्टोमनन हे संयुग हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे आणि भूक नियंत्रित करते. पालक हिमोग्लोबिनची पातळी वाढवून ऊर्जा पातळी देखील राखतो, वजन कमी करताना अशक्तपणा टाळतो.
मेथी पालक सूप
वजन कमी करण्यासाठी हे सूप बनवताना, जास्त प्रमाणात तेल किंवा बटर वापरणे टाळा. प्रथम, बारीक चिरलेली मेथी आणि पालक लसूण, आले आणि थोडी काळी मिरी घालून शिजवा. लसूण आणि आले यांचे मिश्रण थर्मोजेनिक प्रभाव निर्माण करते, शरीराचे तापमान वाढवते आणि कॅलरी बर्न करण्यास उत्तेजन देते. चवीसाठी थोडा लिंबाचा रस घाला, जो व्हिटॅमिन सी प्रदान करेल आणि लोह शोषण्यास मदत करेल.

























































