पाकिस्तानात विद्यार्थ्यांचा 12 फेब्रुवारीला ऐक्य मार्च

खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये वाढणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या तसेच इतर प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पाकिस्तानात 12 फेब्रुवारी रोजी ऐक्य मार्च काढण्यात येणार आहे. हा मार्च सरकारविरोधात असणार आहे.

लाहोर प्रेस क्लबमध्ये आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. या वेळी प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स कलेक्टिव्ह (पीएससी) चे केंद्रीय महासचिव इक्बाल खान, द स्टुडंट्स हेराल्डचे काझी शहरयार तसेच पीएससीच्या प्रवक्त्या सारा अली उपस्थित होत्या.