
वरळी हिट अँड रन प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या शिंदे गटाचा उपनेता राजेश शहा त्याचा मुलगा मिहीर आणि चालक राजऋषी बिडावत या तिघांविरोधात आरोपपत्र तयार केले असून त्याचा मसुदा आज न्यायालयात सादर करण्यात आला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 जानेवारी रोजी सत्र न्यायालयात होणार असून त्यावेळी न्यायालय आरोपींवर आरोप निश्चित करण्याची शक्यता आहे.
वरळी येथे 7 जुलै 2024 रोजी एका बीएमडब्ल्यू कारने नाखवा दाम्पत्याला जोरदार धडक दिली. या अपघातात कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला तर तिचे पती प्रदीप हे जखमी झाले. बेदरकारपणे कार चालवून निष्पाप महिलेचा बळी घेतल्याप्रकरणी शिंदे गटाचा पदाधिकारी असलेल्या राजेश शहा याचा मुलगा मिहीर शहा याला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी तिघांविरोधात न्यायालयात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून या प्रकरणावर 29 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.



























































