
डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने घसरण होत आहे. गेल्या आठवड्यात रुपया 90 चा टप्पा गाठला होता. आता त्यांची 91 पर्यंत घसरण झाली आहे. २०२५ मध्ये भारतीय रुपया सुमारे 3.5 टक्क्यांनी घसरला. त्यामुळे तो आशियातील सर्वात कमकुवत चलनांपैकी एक बनला. रुपयाच्या कमकुवतपणाचा हा ट्रेंड २०२६ मध्येही सुरू आहे आणि तो सध्या अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९० च्या पुढे जात आता ९१ च्या आसपास व्यवहार करत आहे. रुपयाच्या घसरणीबद्दल चर्चा होत आहे. ती सरकार आणि धोरणकर्त्यांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) वेळोवेळी हस्तक्षेप करून रुपयाची जास्त घसरण होण्यापासून रोखले आहे.
हिंदुस्थानही बहुतेक आयात डॉलरमध्ये करतो. त्यामुळे आयातीसाठी रुपये देऊन डॉलर खरेदी केले जातात. जेव्हा रुपया कमकुवत होतो तेव्हा एक डॉलर खरेदी करण्यासाठी अधिक रुपये दिले जातात. एफआयआय विक्री आणि उच्च अमेरिकन टॅरिफनंतर भारतीय रुपया घसरतो. भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९१ पर्यंत घसरत आहे. आपण देशांतर्गत वस्तू किंवा सेवा खरेदी करतो तेव्हा आपण रुपयांमध्ये पैसे देतो. मात्र, जेव्हा आपण परदेशातून वस्तू आयात करतो तेव्हा त्या देशाच्या चलनात किंवा दोन्ही देशांनी स्वीकारलेल्या आंतरराष्ट्रीय चलनात पैसे दिले जातात. म्हणूनच प्रामुख्याने जागतिक व्यापार अमेरिकन डॉलरमध्ये केला जातो.
हिंदुस्थानही बहुतेक आयात डॉलरमध्ये करतो. याचा अर्थ असा की आयातीसाठी रुपये देऊन डॉलर खरेदी केले जातात. जेव्हा रुपया कमकुवत होतो तेव्हा एक डॉलर खरेदी करण्यासाठी जास्त रुपये खर्च येतो. काही वर्षापुर्वी एका डॉलरसाठी सुमारे ८० रुपये मोजले जात होते, आता ते ९१ रुपयांपेक्षा जास्त खर्च करते. या फरकाला विनिमय दर म्हणतात, तो बाजार परिस्थितीनुसार दररोज चढ-उतार होतो.
जागतिक आर्थिक आणि जागतिक राजकीय संघर्ष यामुळे रुपयाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. हिंदुस्थाना जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. मात्र, जगभरातील युद्धजन्य परिस्थिती, जागतील राजकीय तणाव आणि कठोर अमेरिकन व्यापार धोरणे सध्या बाजारावर दबाव आणत आहेत. त्याचा परिणाम म्हणून रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९१ पर्यंत घसरत आहे.
बाजारातील तज्ञांनी सांगितले की, या वर्षी रुपया प्रति डॉलर ९० ते ९२ च्या श्रेणीत राहू शकतो. तथापि, काही तज्ञ असेही म्हणतात की जर हिंदुस्थानने अमेरिकेशी व्यापार करार केला आणि टॅरिफशी संबंधित अनिश्चितता कमी केल्या तर रुपया वाढू शकतो. हे सकारात्मक झाले तर आगामी काळात डॉलरच्या तुलनेत रुपया ८६ ते ८८ च्या दरम्यान मजबूत होऊ शकतो.



























































