वांद्र्यात माघी गणेश जयंती उत्सव

माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून वांद्रे पश्चिम श्री कडेश्वरी मंदिर मार्गावरील श्री गणेश मंदिरात 22 आणि 23 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार 22 जानेवारी रोजी गणेश मूर्तीवर अभिषेक, महाप्रसाद, सुस्वर भजन असे धार्मिक कार्यक्रम होतील. शुक्रवार 23 जानेवारी रोजी महिला, पुरुष आणि मुलांसाठी डान्स स्पर्धा होतील, अशी माहिती सरचिटणीस राजेश्री पवार यांनी दिली.