दादरमध्ये ‘माझी भाषा, माझी शाळा’ व्याख्यान

साने गुरुजी यांची 126 वी जयंती आणि मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने दादर पूर्व नायगाव येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मराठी अभ्यास केंद्र व साने गुरुजी बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी भाषा, माझी शाळा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, 22 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबई मराठी सुरेंद्र गावसकर सभागृहात हे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर तर प्रमुख वत्ते मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार आणि अभिनेत्री चिन्मयी सुमित उपस्थित राहतील. कार्यक्रमात बालविकास मंदिर मासिकाच्या पूज्य साने गुरुजी जयंती विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येईल. विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्था चालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.