
रेल्वे अपघातात प्रवाशांचे बळी जाऊ नयेत याकरिता विविध उपाययोजना केल्या जात असतानाही रेल्वे अपघाती मृत्यूचे प्रकार दररोजच घडतच आहे. आठवडाभरात 35 जणांनी रेल्वे अपघातात आपले प्राण गमावले असून सोमवारी एका दिवशी 13 जण रेल्वे अपघातात बळी गेले.
रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू होऊ नये याकरिता रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जातात. वेळोवेळी जनजागृती केली जाते. परंतु तरीही रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू होण्याचे प्रकार घडतच आहेत. सोमवारी 19 जानेवारी रोजी रेल्वे पोलीस हद्दीत 13 जणांचा अपघाती मृत्यू झाला. त्यात एका महिलेचा समावेश आहे. तर गेल्या पाच दिवसांच्या कालावधीत 34 जणांनी रेल्वे अपघातात आपला नाहक जीव गमावला. मृतांमध्ये बेवारस पुरुषांचादेखील समावेश आहे.


























































