
पुणे ग्रामीण पोलिसांनी शिरूरमध्ये मेफेड्रोन विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त करत तब्बल साडेदहा किलो मेफेड्रोनचा साठा जप्त केला आहे. ड्रग्ज रॅकेटमध्ये अहिल्यानगर पोलीस दलातील हवालदार शामसुंदर गुजर याचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत या प्रकरणात चौघांना अटक झाली आहे.
ड्रग्ज पुरवणाऱ्या ज्ञानदेव शिंदे, महेश गायकवाड, ऋषिकेश चित्तर यांच्या चौकशीतून या प्रकरणात अहिल्यानगर जिह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असलेला पोलीस हवालदार शामसुंदर गुजर हा सहभागी असल्याचे स्पष्ट झाले.

























































