
विक्रोळी येथे सोमवारी मन सुन्न करणारी घटना घडली. सार्वजनिक रस्त्यावर दोन्ही बाजूला लावलेले मोठे लाऊड स्पीकर चार वर्षांच्या मुलीच्या अंगावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत जान्वी सोनकर (4) या चिमुकलीचा मृत्यू झाला.
विक्रोळी पूर्वेकडील रोड नंबर 8 येथील भारतमाता मंदिराजवळ जान्वी राहात होती. त्याच परिसरात सोमवारी देवीपुजक मंडळाच्या वतीने कोणतीही परवानगी न घेता सार्वजनिक रस्त्यावर दोन्ही बाजूला स्टँडवर दोन मोठे लाऊड स्पीकर लावले होते. सकाळी सवा अकरा वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती चिंधीचे भले मोठे गाठोडे डोक्यावरून घेऊन जात असताना लटकती वायर त्या गाठोडय़ात अडकली. तसेच ते गाठोडे घेऊन संबंधित व्यक्ती पुढे चालत राहिल्याने दोन्ही स्पीकर रस्त्याच्या मध्यभागी कलंडले. त्याच वेळी जान्वी तेथून धावत जात असताना ते दोन्ही स्पीकरच्या कचाटय़ात सापडली. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी विनोद परमार (30) आणि चिंधी विक्रेता सय्यद अली (55) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
Tragic: 4-Year-Old Girl Dies After Loudspeakers Collapse in Vikhroli
A 4-year-old girl, Janvi Sonkar, died in Vikhroli after unauthorized heavy loudspeakers fell on her. Police booked two individuals for negligence.



























































