
महापालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सहा शिलेदारांनी दणदणीत विजय मिळवला. या नवनिर्वाचित नगरसेवकांचा शिवसेना नेते, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महासभेत आवाज उठवून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडू, असा निर्धार यावेळी विजयी उमेदवारांनी केला.
पनवेल महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या शिलेदारांनी तगडी झुंज दिली. दरम्यान शिवसेनेचे उमेदवार प्रगती पाटील, लीना गरड, उत्तम मोर्बेकर, प्रिया गोवारी, प्रतीक्षा गोवारी, मेघना घाडगे यांनी विरोधकांना घाम फोडला. या विजयी शिलेदारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी अनंत गीते यांनी त्यांचा सत्कार केला. कळंबोलीतील नवीन सुधागड हायस्कूलच्या सभागृहात हा भव्य सत्कार सोहळा पार पडला.
शिवसेना उपनेते बबन पाटील, उपनेते बाळ माने, अवदूत शुक्ला, सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, भरत पाटील, महानगरप्रमुख अवचित राऊत, प्रदीप ठाकूर, तालुकाप्रमुख संदीप तांडेल, तालुका संपर्कप्रमुख रामदास पाटील, ग्राहक कक्षाचे अध्यक्ष शशिकांत डोंगरे, शहरप्रमुख रामदास गोवारी, हेमंत म्हात्रे, प्रदीप केणी, सूर्यकांत मस्कर, विभागप्रमुख महेश गुरव, संतोष म्हात्रे, महिला संघटक संगीता राऊत, सुनंदा पाटील, युवासेनेचे नितीन पाटील, अजय पाटील यांच्यासह सर्व उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख व कार्यकर्ते आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




























































