यूपीमध्ये राजकारण तापलं, मोठ्या घडामोडी – शंकराचार्य विरुद्ध योगी आदित्यनाथ वाद शिगेला; मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ अयोध्येच्या बड्या अधिकाऱ्याचा राजीनामा

Shakaracharya vs Yogi Adityanath: Ayodhya Bureaucrat Resigns in Support of CM

ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यातील वाकयुद्ध आता प्रशासकीय स्तरावर पोहोचले आहे. शंकराचार्यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेमुळे दुखावलेले अयोध्येचे उप जीएसटी आयुक्त प्रशांत कुमार सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि संविधानाच्या समर्थनार्थ आपण हे पाऊल उचलल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हा वाद माघ मेळ्यादरम्यान सुरू झाला. प्रयागराज येथील संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी जात असताना प्रशासनाने रोखल्याचा आरोप शंकराचार्यांनी केला होता. मात्र, गर्दीमुळे चेंगराचेंगरी टाळण्यासाठी केवळ त्यांचा रथ थांबवून पायी जाण्याची विनंती केल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते. यावरून शंकराचार्यांनी संताप व्यक्त करत आंदोलन सुरू केले.

‘कालनेमी’ विरुद्ध ‘राजकारण’ या वादावर भाष्य करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुणाचेही नाव न घेता ‘कालनेमी’चा (रामायणातील कपटी राक्षस) उल्लेख करत सावध राहण्याचा इशारा दिला होता. त्याला प्रत्युत्तर देताना शंकराचार्य म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी शिक्षण, आरोग्य आणि राज्याच्या प्रगतीवर बोलावे. धर्माची बाब आमच्यासारख्या धर्मगुरूंवर सोडावी. राजकारण्यांनी धर्मात हस्तक्षेप करणे अयोग्य आहे.’

UGC नियमावलीवरून नवा वाद

शंकराचार्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) नवीन नियमावलीवरही टीका केली आहे. SC, ST आणि OBC विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी विशेष समित्या स्थापन करण्याच्या निर्णयामुळे हिंदूंमध्ये फूट पडेल आणि जाती-जातीत भेदभाव वाढेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. हे नियम त्वरित रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.

‘अपमान सहन करणार नाही’ – सनदी अधिकाऱ्याचा पवित्रा

मंगळवारी अयोध्येचे डेप्युटी जीएसटी कमिशनर प्रशांत कुमार सिंह यांनी राजीनामा दिला. ते म्हणाले, ‘शंकराचार्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांबद्दल केलेली विधाने समाजात फूट पाडणारी आहेत. हे सरकार माझे ‘अन्नदाता’ आहे आणि लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांचा अपमान मी रोबोटसारखा पगार घेऊन सहन करू शकत नाही. आता मी समाजसेवा करणार आहे.’

दिल्ली डायरी – उत्तर प्रदेशात योगी विरुद्ध अविमुत्तेश्वरानंद

Shakaracharya vs Yogi Adityanath: Ayodhya Bureaucrat Resigns in Support of CM

Ayodhya Deputy GST Commissioner resigns amid the ongoing row between Shankaracharya Avimukteshwaranand and CM Yogi Adityanath over religious and political remarks.