
बारामती बुधवारी सकाळी झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये अजित पवार यांच्यासह मुंबई पीएसओ विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश आहे. मयत पीएसओ विदीप जाधव हे ठाण्यातील विटावा येथील रहिवासी आहेत. जाधव यांच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच त्यांचे कुटुंबीय बारामतीकडे रवाना झाले.


























































