फ्लेक्सो किंगला विजेतेपद

फ्लेक्सो किंग-लेबल डिव्हिजन संघाने ड्रिम एकादश संघाचा 27 धावांनी पराभव करत नोबल प्रिंटिंग प्रेस आयोजित मर्यादित षटकांच्या आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ड्रिम एकादश संघाच्या गोलदाजांच्या भेदक माऱयासमोर फ्लेक्सो किंग संघाच्या फलंदाजाना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांना निर्धारित षटकांमध्ये 5 फलंदाजांच्या मोबदल्यात फक्त 68 धावा करता आल्या. त्यानंतर फ्लेक्सो किंगच्या गोलंदाजांनी फलंदाजांचे अपयश धुऊन टाकताना ड्रिम एकादश संघाला 6 बाद 42 धावांवर रोखत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धेचे प्रमुख संयोजक विजय चमारिया आणि पराग चमारिया यांच्या हस्ते चषक देऊन गौरवण्यात आले.