कपाटातील साडय़ा खराब होतात…

प्रातिनिधिक फोटो

कपाटात ठेवलेल्या साडय़ा दीर्घकाळाने खराब होतात. रेशमी आणि जरीच्या साडय़ांना फटका बसतो. असे होऊ नये म्हणून साडय़ा 6 महिन्यांतून एकदा कपाटातून बाहेर काढून सावलीत सुकवाव्यात. साडय़ा प्लास्टिकमध्ये ठेवण्याऐवजी सुती कापडात किंवा मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवाव्यात. साडय़ांच्या घडय़ा बदलत राहाव्यात.

कपाटात ओलावा टाळण्यासाठी सिलिका जेलचे पाकीट किंवा वाळलेला कडुलिंबाचा पाला ठेवावा. जरीच्या जड साडय़ा हँगरला लटकवून न ठेवता, घडी करून ठेवाव्यात. साडीवर डाग असतील तर घरगुती उपाय करण्याऐवजी ड्रायक्लीनिंग  करावे. जरी काळी पडली तर ती कापसाने हलक्या हाताने साफ करावी.