
बारामतीमध्ये अपघात झालेल्या विमानाचे मुख्य पायलट कॅप्टन सुमित कपूर अत्यंत अनुभवी पायलट होते. टेकऑफ आणि लँडिंगच्या महत्त्वाच्या काळात ते फ्लाइटमधील सर्व कर्मचाऱयांची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांना 16,000 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव होता. यापूर्वी त्यांनी सहारा, जेटलाइन आणि जेट एअरवेजसारख्या मोठय़ा कंपन्यांसोबत काम केले होते. ते मूळचे दिल्लीचे होते. तर विमान अपघातात मृत्यू झालेली फर्स्ट ऑफिसर कॅप्टन शांभवी पाठक ही एका लष्करी अधिकाऱयाची मुलगी होती. ग्वाल्हेरमधील एअर फोर्स स्कूलमध्ये तिने शिक्षण घेतले आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठातून एअरोनॉटिक्स आणि विमान उड्डाणाचा अभ्यास केला. मध्य प्रदेश फ्लाइंग क्लबमधून तिने कारकीर्दीची सुरुवात केली. कठोर परिश्रम आणि चिकाटीने ती कार्यरत होती.





























































