
मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘पालिका मुख्यालय हेरिटेज टूर’च्या शुभारंभप्रसंगी 28 जानेवारी 2021 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुमासदार भाषण केले होते. उत्पृष्ट वास्तुकलेचा नमुना असणारे पालिका मुख्यालय ब्रिटिश संकल्पनेतील असले तरी इमारतीच्या बांधकामात मुख्य योगदान मराठी माणसाचे असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले होते. या कार्यक्रमात तत्कालीन पालिका आयुक्त चहल यांच्यासह सरकारी अधिकारी आणि विरोधकांना चांगलेच टोले हाणले होते. तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले होते.
अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले होते की, मुंबई महानगर हे सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक अशा अनेक चळवळींचे, क्रांतीचे पेंद्रबिंदू राहिले आहे. परकीय सत्तांना घालवून लावण्याचे पेंद्र मुंबईच होते. महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलं. अनेक मोठी माणसं, महापुरुष या शहराने घडवले. मुंबईतील माणूस हा नेहमी मदतीला धावून येणारा, प्रत्येक संकटाला परतवून लावणारा आहे. या शहरामध्ये अनेक इमारती वास्तुकलेचा उत्पृष्ट नमुना आहेत. त्यात महानगरपालिकेचे मुख्यालयदेखील समाविष्ट आहे. आज हे मुख्यालय आतून पाहण्याची संधी कधी मिळाली नव्हती. ही संधी आज मिळाली. हा उपक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेणारे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे कौतुक करतो!





























































