प्रयागराज: अविमुत्तेश्वरानंद यांनी माघ मेळा सोडला!

गेल्या 11 दिवसांपासून धरणे आंदोलनास बसलेले शंकराचार्य अविमुत्तेश्वरानंद यांनी आज अखेर माघ मेळा सोडला. ते काशीसाठी रवाना झाले आहेत. तत्पूर्वी, त्यांनी प्रशासनावर तीव्र टीका केली. स्नानाविनाच आम्हाला मेळा सोडावा लागत आहे. यामुळे मनाला वेदना होत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

प्रयागराज ही आस्थेची आणि शांततेची भूमी आहे. मोठ्या श्रद्धेने मी येथे आलो होतो. मात्र असे काही घडेल याची कधी कल्पनाही केली नव्हती. सनातनचा ज्यांनी अपमान केला आहे त्यांना जागा दाखवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

‘पालखीतून संगमावर घेऊन जाण्याचा व अंगावर पुष्पवर्षाव करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने माझ्यापुढे ठेवला होता, मात्र मी तो धुडकावून लावला,’ असेही ते म्हणाले.