
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून ते बारामतीला सभेसाठी जात होते. मात्र बारामतीच्या धावपट्टीजवळ आल्यावर लो व्हिजीबिलीटीमुळे विमान धाडकन खाली कोसळलं आणि विमानाने पेट घेतला. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मनसे नेते राज ठाकरे, नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते यांसह अजित दादांचे कुटुंबिय, त्यांचे चाहते, बारामतीकर उपस्थित होते. अजित पवार यांना शासकीय इतमामात अंतिम निरोप देण्यात आला.
1999 पासून अजित पवार यांच्या वाहनाचे चालक असलेल्या श्यामराव नारायण मनवे यांनी अजित दादांनी माझे ऐकले असते तर ही दुर्घटना टळली असती, असे सांगितले, त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. मनवे यांनी सांगितले की, मी 1999 पासून अजित दादांचा चालक आहे. परवा रात्री दादांच्या मिटिंग लवकर झाल्या होत्या. मी त्यांना म्हणालो की, आपण गाडीने बारामतीला जाऊयात… यावर दादांनी नकार दिला आणि मला म्हणाले मी जातो तू गाडीने ये पुण्याला… त्यांनी माझे ऐकले नाही. त्यांनी माझे ऐकले असते तर हा अनर्थ टळला अशता. माझा देव गेला म्हणत श्यामराव मनवे यांनी टाहो फोडला.



























































