
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह बारामती येथे जाऊन अजितदादांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. ठाकरे कुटुंबीय बुधवारी रात्रीच बारामतीत पोहोचले. सुनेत्रा पवार, पार्थ, जय तसेच सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांनी विचारपूस केली आणि त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला.





























































