
मूर्ती लहान, कीर्ती महान हे शब्द अनेकदा कानावर पडले असतील. परंतु, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. इंग्लंडच्या मॅन्चेस्टर येथील अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्याने अशी काही कामगिरी करून दाखवली आहे की, त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या दोन वर्षीय मुलाचे नाव आहे जूड ओवेन्स. जुडला स्नूकर खेळण्याचा भारी नाद आहे. त्याने कमी वयात दोन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् आपल्या नावावर केले आहेत. दोन ट्रिकवर शॉट मारणारा जुड ओवेन्स सर्वात कमी वयाचा खेळाडू बनला आहे. त्याचा व्हिडीओ पाहून अनेक यूजर्संनी त्याचे तोंडभरून काwतुक केले आहे. कमी वयात मोबाईल पाहण्यापेक्षा त्याने जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याचे काwतुक तर झालेच पाहिजे, असे एका यूजरने म्हटले आहे. हे सर्व काही अनाकलनीय आहे, कमी वयात कसे काय शक्य आहे, असे सांगत यूजर्स त्याचे काwतुक करत आहेत.
























































