Budget 2026 – या अर्थसंकल्पात जुन्याच गोष्टी नवीन पॅकमध्ये लेबलसह दिल्यात; रोहिणी आचार्य यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. दरवर्षीप्रमाणे अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या असल्या तरी, सामान्य माणसासाठी मात्र कोणतीही मोठी घोषणा झालेली नाही. यावरून विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहेत. या अर्थमसंकल्पात जुन्याच गोष्टी नवीन पॅकमध्ये दिल्यात, अशी टीका लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी सरकारवर केली आहे.


याबाबत रोहिणी आचार्य यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, हा अर्थसंकल्प म्हणजे जुन्या वस्तू नवीन बॉक्समध्ये नवीन लेबलसह देण्यासारखे आहे. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी दरडोई उत्पन्न कसे वाढवले ​​जाईल? अर्थसंकल्पात याबद्दल स्पष्टता नाही. डिजिटल कंटेंट निर्मितीला प्रोत्साहन देण्याची चर्चा असताना, देशातील सुशिक्षित आणि अशिक्षित तरुणांसाठी प्रत्यक्षात रोजगार निर्मिती कशी आणि कोणत्या क्षेत्रात होईल? देशासमोरील या सर्वात गंभीर मुद्द्यावरही, अर्थसंकल्पात स्पष्ट रोडमॅपचा अभाव आहे. बिहारसाठी पूर व्यवस्थापन, पूर प्रतिबंध, पूरोत्तर पुनर्वसन आणि सिंचन संसाधनांच्या बांधकाम आणि विकासासाठी विशेष पॅकेजच्या महत्त्वाच्या आणि दीर्घकालीन मागणीसाठी अर्थसंकल्पीय तरतूद नाही हे निराशाजनक आहे…असे त्यांनी म्हटले आहे.