
दापोलीतील पालगड पंचायत समिती गणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार जनार्दन हळदे यांना पंचायत समिती निर्वाचन गणातील गावा गावातील वाड्या वस्त्यांमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
दापोली तालुक्यातील पालगड जिल्हा परिषद गट हा राजकीयदृष्टया अतिशय महत्वाचा असा गट मानला जातो . अशा या जिल्हा परिषद गटात शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) , महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्ष एकत्रितपणे लढत आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. अशा या जिल्हा परिषद गटातील पालगड पंचायत समिती निर्वाचन गणाचा विचार करता या पालगड पंचायत समिती गणात आवाशी गावचे उद्योजक जनार्दन शांताराम हळदे हे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेची भक्कम साथ आहे.
या अतिशय संवेदनशील अशा महत्वाच्या पंचायत समिती गणात त्यांनी निवडणूक प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. त्याचा प्रत्यय हा निवडणुक प्रचारादरम्यान पाहायला मिळत आहे. मितभाषी स्वभाव असलेले पण तितकेच करारी बाणा व्यक्तीमत्व असलेल्या कर्तव्यदक्ष अशा जनार्दन हळदे यांना गावागावांतील समस्यांची चांगलीच जाण आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या करिश्म्याने सर्वांना आपलेसे केले आहे. त्यांच्या निवडणूक प्रचारात आवाशी ग्राम पंचायतीच्या सरपंच सुवर्णा शेडगे , उपसरपंच विनोद शेडगे , मंगेश शिंदे , राजाराम शेडगे , कृष्णा शेडगे , इस्माईल मुंडेकर (अल्पसंख्याक मुस्लिम संघटक) , बशीर मसुरकर , सचिन शेडगे , राजेंद्र प्रसादे ,विजय कदम ,महेश चव्हाण , स्वप्निल चाळके , महादेव जाधव , रंजना चाळके ,प्रकाश तळवटकर आदींसह मोठ्या संख्येने गावा गावातील शिवसेना , राष्ट्रवादी तसेच मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी सामिल झाले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचारादरम्यान श्री.हळदे यांना गावागावात वाडीवस्तीत मोठा प्रतिसाद मिळत आहे.






























































