
हिंदुस्थान आणि युरोपियन युनियन (ईयू) च्या मुक्त व्यापार करारामुळे पाकिस्तानमधील तब्बल एक कोटी नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. 27 जानेवारीला हिंदुस्थान आणि ईयू यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती. हिंदुस्थान-युरोप यांच्यातील मुक्त करार 2027 मध्ये लागू केला जाणार आहे. एफटीए लागू झाल्यानंतर बऱयाच वस्तूंवरील कर 10 टक्के स्वस्त होईल. या करारानंतर पाकिस्तानचे माजी वाणिज्य मंत्री गोहर एजाज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली असून यात म्हटले आहे की, ईयूसोबत पाकिस्तानचा ‘झीरो-टॅरिफ हनिमून’ संपला आहे. पाकिस्तानमधील एक कोटी नोकऱया धोक्यात आहेत. सरकारने उद्योगांना स्वस्त वीज, कमी कर आणि सुलभ कर्ज द्यावे, जेणेकरून ते इतर देशांतील उद्योगांशी स्पर्धा करू शकतील.































































