
विरोधी पक्षांना संसदेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत अध्यक्षांवर कागदपत्रे फेकली. कागदपत्रे फेकणाऱ्या काँग्रेसच्या सात आणि माकपच्या एका खासदारासह आठ विरोधी खासदारांचे पूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले आहे. या निलंबनानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेसच्या खासदारांनी संसदेच्या आवारात निदर्शने केली. तसेच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी या निलंबनाबाबत संताप व्यक्त करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
#WATCH | Delhi: Congress MPs, including Lok Sabha LoP Rahul Gandhi, Priyanka Gandhi Vadra and other MPs protest at Makar Dwar of the Parliament, against the suspension of 8 MPs from Lok Sabha and against the India-US trade agreement.
The suspended MPs include Hibi Eden,… pic.twitter.com/iXQx8SAP5Q
— ANI (@ANI) February 3, 2026
लोकसभेतून आठ काँग्रेस खासदारांच्या निलंबनावर काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या की, ही घटना खूपच निषेधार्ह आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक सदस्याला बोलण्याचा अधिकार आहे, सरकरानेही त्यांचे म्हणणे एकून घेण्याची तयारी दाखवावी. लोकसभेत विरोधी पक्षांना बोलू दिले जात नाही. ही चिंतेची बाब आहे, असे त्या म्हणाल्या. खासदारांच्या या निलंबनाबाबत विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहे.
#WATCH | Delhi | On the suspension of eight Congress MPs from Lok Sabha, Congress MP Priyanka Gandhi Vadra says, “This is ridiculous. In a democracy, every member should have the right to speak and their concerns should be heard” pic.twitter.com/SWKMOnfvN0
— ANI (@ANI) February 3, 2026
निलंबनानंतर विरोधी पक्षांनी संसदेच्या आवारात निदर्शने करत, नरेंद्र मोदी,सरेंडर मोदी, मोदी-ट्रम्प बाय बाय अशी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. अधिवेशनासाठी लोकसभेतून ८ खासदारांच्या निलंबनावर आरजेडी खासदार मनोज झा यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की. सरकारने विरोधी पक्षाच्या खासदारांचे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी दाखवायला हवी.जर याआधीही अशाच पद्धतीने निलंबन केले गेले असते, तर २०१२-२०१३ मध्ये संपूर्ण भाजपलाच निलंबित करण्यात आले असते, असा टोलाही त्यांनी लगावला.
#WATCH | Delhi | On the suspension of 8 MPs from the Lok Sabha for this session, RJD MP Manoj Jha says, “…The government should also have an appetite for listening to the concerns of the opposition MPs…The entire BJP would have been suspended in 2012-2013 if suspension had… pic.twitter.com/79R7aFaZhb
— ANI (@ANI) February 3, 2026
विरोधी पक्षांना संसदेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत अध्यक्षांवर कागदपत्रे फेकली. कागदपत्रे फेकणाऱ्या काँग्रेसच्या सात आणि माकपच्या एका खासदारासह आठ विरोधी खासदारांचे पूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले आहे. विरोधी खासदारांच्या निलंबनानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. यानंतर अध्यक्षांनी लोकसभेचे कामकाज बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आले.


























































