
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सी-टीईटी) देणाऱया शिक्षकांना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कामातून सूट दिली आहे.
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्याच वेळी राज्यातील काही शिक्षकांची सी-टीईटी परीक्षा आहे. निवडणुकीच्या कामासाठी लावण्यात आल्यामुळे त्यांना परीक्षेला जाता येणार नव्हते. त्याची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने संबंधित शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट दिली आहे.






























































