जियो स्टुडिओजची ‘सिख्या एंटरटेनमेंट’मध्ये भागीदारी; 50.1 टक्के हिस्सा 150 कोटींना खरेदी केला 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेडने सिख्या एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 50.1 टक्के इक्विटी हिस्सा 150 कोटी रुपयांना अधिग्रहित केला आहे. यामुळे रिलायन्सच्या मीडिया आणि कंटेंट क्षेत्रातील कंपनी जियो स्टुडिओजची मनोरंजन उद्योगात आणखी भक्कम झाली आहे.

गुनीत मोंगा कपूर आणि अचिन जैन यांनी स्थापन केलेल्या सिख्या एंटरटेनमेंटने गेल्या दशकात भारतीय कथांना जागतिक पातळीवर नवी ओळख मिळवून दिली आहे. सिख्या एंटरटेनमेंटने नेहमीच अशा कथा सादर केल्या आहेत, ज्या खोलवर भारतीय असतानाच जागतिक प्रेक्षकांशीही नाते जोडले आहे, असे जियो स्टुडिओजच्या प्रेसिडेंट ज्योती देशपांडे म्हणाल्या. जियो स्टुडिओजसोबतची ही भागीदारी आम्हाला आमच्या कथा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची आणि देशभरातील नव्या टॅलेंटला पुढे आणण्याची संधी देईल, असे सिख्या एंटरटेनमेंटचे संस्थापक गुनीत मोंगा कपूर आणि अचिन जैन यांनी सांगितले.