डीआरडीओच्या एसएफडीआर तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)ने सॉलिड फ्युएल डक्टेड रॅमजेट (एसएफडीआर) तंत्रज्ञानाची यशस्वी उड्डाण चाचणी केली. या कामगिरीसोबत हिंदुस्थान त्या निवडक देशांच्या समूहात सामील झाला आहे. ही चाचणी ओडिशाच्या किनाऱ्याजवळ चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये केली. हे तंत्रज्ञान हवेतून हवेत लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र बनविण्यास मदत करते. चाचणीदरम्यान डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळांचे वरिष्ठ वैज्ञानिक उपस्थित होते.