शॉर्ट व्हिडीओ सर्वाधिक गावाकडे पाहतात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात इंटरनेट यूजर्सच्या संख्येत 8 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही संख्या आता 95.8 कोटीवर पोहोचली आहे. इंटरनेटवर सर्वात जास्त शॉर्ट व्हिडीओ हे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील लोक पाहतात. ग्रामीण भागात इंटरनेट पोहोचल्याने शॉर्ट-व्हिडिओची लोकप्रियता आणि एआयचा वापर वाढला आहे, अशी माहिती इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालातून समोर आली आहे. या अहवालानुसार, शहरी भागांमध्ये जिथे इंटरनेटची वाढ 3 टक्के होती, तिथे ग्रामीण भागांमध्ये हा आकडा 12 टक्क्यांपर्यंत राहिला आहे. यामध्ये लोकसंख्येचा मोठा फरक आहे. देशाच्या 153.7 कोटी लोकसंख्येपैकी जवळपास 55 कोटी ग्रामीण लोक इंटरनेट वापरतात. 44 टक्के वापरकर्ते व्हॉइस-इमेज सर्चसारख्या एआय-सक्षम वैशिष्टय़ांचा वापर करतात. तर 61 टक्के यूजर्स शॉर्ट-व्हिडिओ कंटेंट पाहतात, यामध्ये ग्रामीण वापरकर्त्यांची संख्या शहरी वापरकर्त्यांपेक्षा जास्त आहे.