
शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी मुंबई विद्यापीठाने ‘एलएमएम’ अभ्यासक्रमाच्या परीक्षा फेब्रुवारीत घेण्याचे निश्चित केले आहे. मात्र अचानक जाहीर करण्यात आलेल्या या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास कमी वेळ मिळणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका आहे. त्यामुळे एलएमएमच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी युवासेनेने केली आहे.
एलएमएमच्या परीक्षा अचानक जाहीर करण्यात आल्यामुळे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी कुलसचिव प्रसाद कारंडे यांची भेट घेऊन एलएमएम परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्याकरिता याची किमान एक महिना आधी कल्पना देणे गरजेचे होते. असे असताना शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याच्या नावाखाली त्यांना वेठीस धरणे किती योग्य आहे? मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास जबाबदार कोण? असे सवाल युवासेनेने उपस्थित केले आहेत. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना अभ्यासाची पूर्ण संधी देऊन किमान एक महिना अगोदर परीक्षा वेळापत्रक जाहीर करून परीक्षा घेतली जावी, अशी आग्रही मागणी केली. या वेळी कुलसचिव कारंडे यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचे आश्वासन दिले.
yuva sena demands postponement of mumbai university llm exams to save student year
yuva sena members meet mumbai university registrar to delay llm exams scheduled for february. students seek more preparation time as sudden exam dates spark concerns.




























































