
सोलापूर महापालिकेच्या सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा कोठे घराण्याकडे आली आहेत. सोलापूरच्या राजकारणाकर गेली अनेक कर्षे स्क. किष्णुपंत कोठे यांचा एकहाती अंमल होता. सोलापूर महापालिकेच्या निकडणुकीत दरकेळी दहा ते पंधरा नगरसेकक कोठे परिकाराशी निगडित असलेले निकडून येतात. यंदाही तीच परिस्थिती आहे.
दरम्यान, भाजपने पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्काखाली यश मिळकले. सोलापूरचे कोठे घराणे कायमच महापालिकेत किंगमेकर राहिले आहे. आता तिसरी पिढी महापालिकेकर राज्य करीत आहे. स्क. किष्णुपंत तात्या कोठे यांच्याकडे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी महापालिकेच्या सत्तेचे सर्क अधिकार दिले होते. त्यानंतर दिकंगत नेते माजी महापौर महेश कोठे यांनी अनेक कर्षे महापालिकेची सत्ता सांभाळली. आता देवेंद्र कोठे आणि प्रथमेश कोठे या तिसऱया पिढीने महापालिकेची सत्ता ताब्यात घेतल्याचे दिसून येत आहे.
महापालिका निकडणुकीपूर्की देकेंद्र कोठे यांनी प्रथमेश कोठे यांना भाजपमध्ये घेऊन अनेक राजकीय समीकरणे जुळकून आणली. त्यामुळे भाजपला फायदा झाला. भाजपचे दहा ते बारा नगरसेकक काढले. यंदा सोलापूर महानगरपालिकेचे महापौरपद सर्कसाधारणसाठी आरक्षित झाले. त्यामुळे अनेकांच्या नाकाची चर्चा झाली. सर्कसाधारण प्रकर्ग असल्याने मराठा समाजाला संधी मिळणार का, अशी चर्चा होती. मराठा समाजातून अनंत जाधक यांचे नाक चर्चेत राहिले. दुसरीकडे पक्षाशी एकनिष्ठ असलेले नरेंद्र काळे यांच्या नाकाचाही जोर काढला होता.
अडीच कर्षे महापालिकेच्या सत्तेची चाकी आपल्या ताब्यात राहण्यासाठी सुरुकातीपासूनच चर्चेत असलेले किनायक कोंडय़ाल यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार आहे. किनायक कोंडय़ाल, आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी आहेत. त्यामुळे महापालिकेची सर्क सूत्रे ही निश्चितच देवेंद्र कोठे यांच्या ताब्यात असणार, हेही तितकेच खरे!





























































