स्पेसएक्स आणि एक्सएआयचे विलीनीकरण; मस्क अंतराळातून ’एआय’ चालवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्पेसएक्स कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी स्पेसएक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप एक्सएआयचे विलीनीकरण केले आहे. या अधिग्रहणामुळे स्पेसएक्स आता केवळ अंतराळ आणि संरक्षणातच नाही, तर जगातील सर्वात पॉवरफुल एआय पंपन्यांमध्येही समाविष्ट झाली आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन वर्षांत एआय कंप्युटिंग करण्याचा सर्वात स्वस्त मार्ग अंतराळच असेल, असे मस्क यांनी म्हटले आहे. यापुढे मस्क हे अंतराळातून एआय चालवतील, हे स्पष्ट झाले आहे.

जगभरात एआयसाठी विजेची जी मागणी आहे, ती जमिनीवरील सध्याच्या उपायांनी पूर्ण करणे शक्य नाही. दीर्घकाळात पाहिल्यास स्पेस-आधारित एआय हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. या विलीनीकरणासाठी स्पेसएक्सने गेल्या आठवडय़ात एफसीसीकडे अर्ज केला होता. अधिग्रहणानंतर स्पेसएक्सचे एपूण मूल्यांकन एक ट्रिलियन डॉलर म्हणजेच, जवळपास 90 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर एक्सएआयचे मूल्य 250 बिलियन डॉलर म्हणजेच, जवळपास 22 लाख कोटी रुपये अंदाजित करण्यात आले आहे.

मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले असून त्यांची संपत्ती ही पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या जीडीपीपेक्षा जास्त झाली आहे. पर्ह्ब्सच्या माहितीनुसार, मस्क यांच्या संपत्तीच्या जवळपासही अन्य दुसरी कोणती व्यक्ती नाही. मस्क यांच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत आहे. मस्क यांच्या संपत्तीत एका दिवसात 84 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास सात लाख कोटींची वाढ झाली आहे. मस्क यांची एपूण संपत्ती पाहिल्यास पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेच्या संपूर्ण जीडीपीहून जास्त आहे. मस्क यांची संपत्ती ही हिंदुस्थानातील टॉप 40 श्रीमंत लोकांच्या एपूण संपत्तीहून जास्त आहे.