मोदीजी सत्याला इतके घाबरले की खोट्याला शरण गेले… राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत लोकसभेत अघटित घटना घडू शकते त्यामुळे त्यांचे लोकसभेतील भाषण रद्द करण्यात आल्याचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. त्यानंतर पंतप्रधानांनी राज्यसभेत तब्बल दीड तास भाषण केले. मात्र या भाषणात त्यांना माजी लष्कर प्रमुख मनोज नरावणे आणि चीनच्या आक्रमणाचा साधा उल्लेखही केला नाही.

पंतप्रधानांच्या राज्यसभेतील भाषणानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला. ”फक्त प्रश्नांना इतके घाबरले? मोदीजी खऱ्याला असे घाबरले की ते खोट्याला शरण गेले. असो त्यांना जे योग्य वाटले ते त्यांनी केले’, असे ट्विट करत मोदींवर टीका केली.