
मुंबई विद्यापीठातील ‘जश्न ए उर्दू’ या कार्यक्रमातून अखेरच्या क्षणी डावलण्यात आल्याबद्दल अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘देशविरोधी वक्तव्याचे कारण देऊन मला डावलल्याचे सांगितले जाते. पण आजवर तसे एकही वक्तव्य मी केलेले नाही. स्वयंघोषित विश्वगुरूचे कौतुक मी कधी केले नाही हे मात्र खरे आहे,’ असा खोचक टोला नसीर यांनी एका लेखातून हाणला.
मी ज्या देशात वाढलो, ज्या देशानं मला प्रेम करायला शिकवलं, तो हा देश नाही. इथं ‘वैचारिक पोलिसिंग’ आणि ‘दुटप्पीपणा’ वाढलाय. कधी काळी एखाद्याबद्दलचा द्वेष दोन मिनिटं टिकायचा, आता त्याची जागा 24 तासांच्या द्वेषानं घेतलीय.





























































