असं झालं तर… सिबिल स्कोर तपासायचा आहे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यानचा तीन अंकी क्रमांक असून तो कर्ज परतफेडीचा इतिहास आणि क्रेडीट योग्यता दर्शवतो. 900 च्या आसपासचा स्कोर उत्तम.

सिबिल स्कोर 750च्या पुढे असल्यास कर्ज सहज मिळते. तसेच व्याजदरही कमी आकारले जाते. 650 पेक्षा कमी सिबिल स्कोर धोकादायक मानला जातो.

सिबिल स्कोर जाणून घेण्यासाठी सिबिलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तुमचे नाव, ईमेल आयडी, पॅन कार्ड नंबर, जन्म तारीख आणि मोबाईल नंबर टाका.

तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाका. लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्डवर तुमचा सिबिल स्कोर आणि क्रेडिट अहवाल दिसेल. त्यासाठी शुल्क लागत नाही.

सिबिल स्कोर किती आहे, हे जाणून घेण्यासाठी बँकांचे ऍप्स, पेटीएम-गुगल पे यासारखे यूपीआय ऍप उपयोगी पडतात. नियमितपणे सिबिल स्कोर तपासल्याने तो कमी होत नाही.