
कांदेपोहे बनवण्याची सर्वात पहिली स्टेप आहे ती म्हणजे तुम्ही पोहे कसे व किती वेळी धुता किंवा पाण्यात भिजवता. पोहे पाण्यातून भिजवून काढल्यानंतर ते थोडा वेळ बाजूला ठेवून द्या. जेणेकरून पोहे नरम होतील आणि चांगले फुलतील.
पोह्यात मीठ टाकल्यानंतर वरून थोडे पाणी शिंपडा आणि पोह्यावर झाकण ठेवून चांगली वाफ घ्या. लक्षात ठेवा की गॅस मंद आचेवर असू द्यावा. पोहे वाफेवर छान शिजतात. पोहे एकदा का फोडणीला टाकले की ते जास्त वेळ शिजवू नका.



























































