
युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने ‘वर्स्ट ऑफ द वर्स्ट’ नावाची एक नवीन वेबसाइट सुरू केली आहे. त्यात अटक केलेल्या आणि दोषी ठरलेल्या “गुन्हेगार बेकायदेशीर परदेशी नागरिकांची” सार्वजनिकपणे यादी देण्यात आली आहे. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, यादीमध्ये दोषी व्यक्तींची नावे, छायाचित्रे, गुन्हे आणि राष्ट्रीयत्व यांचा समावेश आहे. सध्या, या साइटवर 89 हिंदुस्थानींचा समावेश आहे.
सोशल मीडियावर याबाबतची माहिती देताना, डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने म्हटले आहे की, “डीएचएसने http://WOW.DHS.GOV सुरू केले आहे, जेणेकरून अटक करत असलेल्या गुन्हेगार बेकायदेशीर परदेशी नागरिकांना, त्यांचे गुन्हे यांची माहिती आहे. तसेच मारेकरी, लैंगिक गुन्हेगार आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे.
यू.एस. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी यू.एस. इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) द्वारे अटक केलेल्या सर्वात वाईट गुन्हेगार परदेशी नागरिकांची माहिती देण्यात आली आहे. सूचीनुसार, वेबसाइटवरील हिंदुस्थानी नागरिकांवर लैंगिक गुन्हा, बलात्कार, अंमली पदार्थांची तस्करी, चोरी, मद्यपान करून वाहन चालवणे, धडक देऊन पळून जाणे, तस्करी, फसवणूक, दरोडा, हल्ला, अपहरण, मनी लाँडरिंग, अंमली पदार्थ बाळगणे आणि कौटुंबिक हिंसाचार यासह विविध गुन्हे दाखल आहेत.
अवैध परदेशी नागरिकांच्या गुन्हेगारीचा प्रश्न येतो, तेव्हा प्रत्येक राज्य हे सीमावर्ती राज्य असते. म्हणूनच डीएचएस आमच्या नवीन ‘सर्वात वाईट गुन्हेगार’ वेबसाइटवर वापरकर्त्यांना राज्यानुसार शोधणे आणखी सोपे करत आहे, ज्यामुळे अमेरिकन लोकांना त्यांच्या समुदायातून कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी काढून टाकलेल्या गुन्हेगारांना पाहण्यासाठी अधिक पारदर्शकता मिळेल. आमचा संदेश स्पष्ट आहे की, गुन्हेगार सध्या कुठेही राहत असले तरी आम्ही त्यांना अटक करत अमेरिकन लोकांचे संरक्षण करू, अशी माहिती देण्यात आली आहे.





























































