
इराणमध्ये राहणाऱया अमेरिकन नागरिकांनी तत्काळ इराण सोडावे, अशा स्पष्ट सूचना अमेरिकन दूतावासांनी आपल्या नागरिकांना दिल्या आहेत. शक्य तितक्या लवकर इराण सोडा. बाहेर पडण्याची योजना स्वतःच तयार करा आणि यात अमेरिकन सरकारच्या मदतीवर अवलंबून राहू नका, असेही अमेरिकन दूतावासाने म्हटले आहे.
इराणमध्ये देशव्यापी निदर्शने आणि अशांततेमुळे सुरक्षा व्यवस्था कडक झाली आहे. रस्ते बंद आहेत, सार्वजनिक वाहतूक ठप्प आहे, इंटरनेट आणि मोबाईल-लँडलाइन सेवा वारंवार बाधित होत आहेत. अनेक एअरलाइन्सनी इराणमध्ये ये-जा करणाऱया विमानांना मर्यादित करण्यात आले आहे. अमेरिकन दूतावासांनी आपल्या नागरिकांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत. या सूचनेनुसार, जर त्वरित बाहेर पडणे शक्य नसेल तर सुरक्षित ठिकाणी रहा. तेथे अन्न, पाणी, औषधे आणि आवश्यक वस्तूंचा साठा करून ठेवा. इंटरनेट बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुटुंब आणि मित्रांशी संपर्प साधण्यासाठी इतर मार्ग शोधा. सुरक्षेसाठी काही महत्त्वाचे सल्लेदेखील देण्यात आले आहेत, जसे की निदर्शने आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहावे, पह्न नेहमी चार्ज ठेवावा, पुटुंबाशी संपर्प साधावा आणि स्थानिक माध्यमांवर लक्ष ठेवून परिस्थितीची माहिती घेत राहावे.


























































