साहित्य विशेष – जयवंत दळवी यांच्या साहित्याचा जागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

`जयवंत दळवी : साहित्य अनुवाद आणि प्रकारांतर’ या विषयावर अखिल भारतीय बहुभाषिक राष्ट्रीय चर्चासत्र दि. 31 जाने 26 ते 1 फेब्रुवारी 26 या काळात संपन्न झाले. राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने झालेला मराठीचा जागर ही मराठी भाषकांसाठी वैचारिक मेजवानीच ठरली.

हैदराबाद येथील 103 वर्षांची वैचारिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ऐतिहासिक वास्तूत `जयवंत दळवी : साहित्य अनुवाद आणि प्रकारांतर’ या विषयावर अखिल भारतीय बहुभाषिक राष्ट्रीय चर्चासत्र दि. 31 जाने 26 ते 1 फेब्रुवारी 26 या काळात संपन्न झाले. राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने झालेला मराठीचा जागर ही मराठी भाषकांसाठी वैचारिक मेजवानीच ठरली.

या चर्चासत्रात जयंत धुपकर, डॉ. महेश चंपकलाल, डॉ. वसुधा सहस्रबुद्धे, डॉ. आशुतोष पोतदार, डॉ. डी. एस. चौगुले, डॉ. निर्मोही फडकेट, डॉ. विजय पांसहभागी झाले होते. दळवी यांच्या साहित्यावर अभिवाचन आणि `बॅरिस्टर : तीन रूपं’ याविषयी डॉ. उमा दादेगावकर यांची मुलाखत रंगली.

उद्घाटन सत्रात व्यासपीठावर डॉ. धुपकर, डॉ. शहा, मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष विवेक देशपांडे, कार्यवाह सतीश देशपांडे, विश्वस्त व पंचधाराच्या संपादक डॉ. विद्या देवधर उपस्थित होते. गुजराती रंगभूमी या विषयावर बोलताना बडोदा येथील वक्ते डॉ. महेश चंपकलाल म्हणाले, ”जयवंत दळवी यांची नाटकं गुजराती रंगभूमीवर आली त्याचा अभिमान वाटतो. मूळ नाटकं `संध्या छाया’ आणि `महासागर’ ही गुजराती रंगभूमीवर आली. ती मला आवडली. `संध्या छाया’चे 115 प्रयोग झाले. वसंत कानेटकर यांचे अखेरचा सवाल गुजरातीत गाजले. `पुरुष’ अरुण मेहता यांनी गुजरातीत रूपांतरीत केले, पण ते फार आवडले नाही. रसिकांना भावले नाही.” जयवंत दळवी यांनी लिहिलेली नाटकं केवळ मराठी संस्कृतीपुरतीच मर्यादित नव्हती, तर ती संपूर्ण मानवजातीसाठी समर्पक होती असे त्यांनी पुसांगितले. आपल्या व्याख्यानात दमदार आवाजात काही भूमिका उत्तम सादर केल्या.

रविवार, दि. 1 रोजीच्या पहिल्या सत्रात जयवंत दळवी यांच्या साहित्याची विविध भाषांत अनुवाद या विषयावर झालेल्या परिसंवादात डी. एस. चौगुले (कानडी), डॉ. वसुधा सहस्रबुद्धे (हिंदी), डॉ. आशुतोष पोतदार (इंग्रजी) हे सहभागी झाले होते. चौगुले म्हणाले, “दळवी यांच्या `रुक्मिनी’ या कथेच्या कानडी अनुवादासाठी तीन लेखकांना सांगण्यात आले होते. त्यात माझ्या अनुवादाची निवड झाली. अनुवाद करताना अनुवादकांना किती अडचणी येतात हे त्यांनाच माहीत असते.” डॉ. वसुधा सहस्रबुद्धे म्हणाल्या, लेखक जेव्हा लिहीत असतो तेव्हा संहिता मूक असते, पण दिग्दर्शक ते जिवंत करतो. जयवंत दळवी तर दिग्दर्शकाचे अर्धे काम स्वत:च करीत असत. हिंदी भाषा सेतू म्हणून संवादाचे महत्त्वाचे काम करते. रंगभाषा, दृष्यभाषा याचा विचार अनुवादकालाही करावा लागतो. डॉ. आशुतोष पोतदार यांनी आपल्या विवेचनात नाटकाची निर्मिती प्रािढया साहित्य, अनुवादकता, नाटक, लिहिताना, करताना बदलेली रंगभूमी याविषयी चिंतन मांडले. यादृष्टीने दळवी यांचे नाटय़ लेखन लवचिक असल्याचे त्यांनी सांगितले. संवादात बदल करणे दळवींना मान्य नव्हते. मात्र मूळ आशयास धक्का लागणार नसेल तर ते बदल स्वीकारत. त्यांची ‘स्पर्श’ ही कथा मी इंग्रजीत अनुवादीत केली होती असे सांगून पोतदार म्हणाले. नाटकातून दळवी सामाजिक व्यवस्था उभी करतात. स्थळ आणि काळ हे दोन्ही नाटकासाठी महत्त्वाचे असतात. तेंडुलकर आणि दळवी यांच्या संदर्भात पोतदार म्हणाले, तेंडुलकरांची नाटकं प्रश्न विचारत नाहीत तर ते विचार करायला प्रवृत्त करतात. चर्चासत्राचा अध्यक्षीय समारोप डॉ.विद्या देवधर यांनी केला.

डॉ. उमा दादेगावकर यांची मुलाखत

हैदराबाद येथील जयवंत दळवी यांच्या साहित्याच्या अभ्यासक डॉ. उमा दादेगावकर यांची `बॅरिस्टर : तीन रूपं’ या पुस्तकाविषयी प्रकट मुलाखत झाली. त्यात त्या म्हणाल्या, बॅरिस्टर ही राधाक्काची आधी छोटी कथा होती. नंतर त्याचे कादंबरीत रूपांतर झाले आणि त्यावर नाटक आले. लेखकाला हे का करावेसे वाटले हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती. म्हणून मी अभ्यास करू लागले. त्यातून ‘बॅरिस्टर : तीन रूपं’ हे पुस्तक निर्माण झाले तेव्हा माझ्या लक्षात आले की, ही छोटी कथा बॅरिस्टरची कथा वाटत नव्हती. पण ती राधाक्काची वाटत होती. बॅरिस्टरच्या भूमिकेसाठी पाम गोखले यांची निवड झाल्यावर दळवी यांनी हे पात्र लिहिले असे सांगून उमा म्हणाल्या, दिग्दर्शक विजया मेहता यांच्या रंगसूचना महत्त्वाच्या असतात. त्यावरून प्रेक्षकासमोर देखावा उभा राहतो. सर्वांच्या चर्चेतून हे नाटक उभे राहिले. दळवी यांच्या रंगसूचना एवय़ा व्यवस्थित असतात की, प्रेक्षकांसमोर संपूर्ण नाटक उभे राहते. त्यामुळे दळवी हेच दिग्दर्शकाचे काम करतात असे वाटू लागते. या नाटकातील दळवींचा इंटरेस्ट संपल्याने शेवट हा फार प्रभावी वाटला नाही. यावर जो सिनेमा आला, तो त्यापेक्षा वेगळा वाटतो. दळवींच्या `पा’ कादंबरीवर आलेला सिनेमा हा स्मिता पाटील यांच्या भूमिकेकडे गाजला, असे त्या म्हणाल्या. माधव चौसाळकर, प्रकाश फडणीस यांनी ही मुलाखत घेतली. समारोपाच्या तिसऱ्या सत्रात दळवी यांच्या साहित्यावर अभिवाचन झाले. `सारे प्रवासी घडीचे’ यातील एक कथा विजय नाईक यांनी सादर केली. `ठणठणपाळ’मधील निवडक उतारे चौसाळकर यांनी सादर केले. `पुरुष’मधील संवाद प्रकाश फडणीस, तर गुजराती `पुरुष’मधील संवाद डॉ. महेश चंडकलाल यांनी सादर केले.

समारोप सत्रास अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त कुलगुरू डॉ. विजय पांलाभले होते. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष विवेक देशपांडे, कार्यवाह सतीश देशपांडे, विश्वस्त विद्या देवधर, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत गौतम उपस्थित होते. या वेळी ललित मासिक आणि पत्ररूप दळवी याविषयी मनोगत मांडले व या राष्ट्रीय चर्चासत्राचे वेगळेपण सांगितले. पांयांनी वि. स. खांडेकर यांच्या पत्राविषयीच्या आठवणी सांगितल्या. डॉ. देवधर यांनी गिरीश दळवी यांच्या मनोगताच्या पत्राचे वाचन केले. पसायदानाने चर्चासत्राचा समारोप झाला.