
एण क्रीडति शूकरश्च खनति द्वीपी च गर्वायते। क्रोष्टा कन्दति वल्गते च शशको वेगाद्रुरुर्धावति।
निशंकैः करिपोतकैगिरितटश्चोत्पाट्यते लीलया। हंहो सिंह विना त्वया हि विपिने कीदृग्दशा वर्तते।।
अर्थ: हरिण मोकळेपणाने खेळतो आहे, डुक्कर जमिन उकरतो आहे, बिबट्या बिनधास्त गायींची शिकार करतो आहे; कोल्हा गर्वाने कोल्हेकुई करतो आहे, ससा वेगाने धावत आहे; अगदी हत्तीची पिल्लेसुद्धा डोंगर-झाडांना धक्के देत उन्मत्त वागत आहेत. अरेरे सिंहा! तुझ्याविना या जंगलाची काय अवस्था झाली आहे! भावार्थ: सिंह नसल्यामुळे कोणताही धाक उरलेला नाही, प्रत्येक प्राणी स्वैर वागत आहे, शिस्त आणि समतोल नष्ट झाला आहे, मोठे-लहान भान विसरून उन्मत्त झाले आहेत. सिंहाचे अस्तित्वच ते जणू विसरले आहेत. पण एकदा का सिंह आला की चित्र क्षणात बदलणार आहे. सामाजिक वास्तव पहात असताना नेतृत्व हरपले की जो तो स्वतची मनमानी करू लागतो हा अर्थ येथे सूचित केला आहे.
डॉ. समिरा गुजर-जोशी

























































