देवगड तालुक्यात 57.12 % मतदान! 30353 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगड तालुक्यातील ३ जिल्हा परिषद गट आणि ९ पंचायत समिती गणातील मतदानाला शनिवारी सकाळी ७.३० वाजता शांततेत सुरुवात झाली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत एकूण ५७.१२ % एवढे मतदान झाले .यात पुरुष मतदार १५६९७ व स्त्रिया मतदार १४६५५ व इतर १ एकूण ३०३५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

पहिल्या दोन तासात मतदानाची टक्केवारी ११.५३ %एवढी होती. त्यानंतरच्या पुढील दोन तासात त्यात वाढ होऊन ११.३० वाजे पर्यंत २८.०२ टक्के एवढी होऊन त्यानंतर त्यापुढील कालावधीत मतदारांचा ओघ वाढला. दुपारी १.३० वाजपर्यंत त्यात वाढ होऊन ही टक्केवारी ४१.७४% टक्क्यांवर गेली. देवगड तालुक्यात ३ जिल्हा परिषद गटाकरिता ९ उमेदवार रिंगणात असून ८ पंचायत समिती गणाकरिता १६ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत तालुक्यातील २६ ६७६ पुरुष व २६४६५ महिला मतदार आहेत. त्या पैकी ११३०९ पुरुष व १०८७५ स्त्रिया एवढ्या मतदारांनी दुपारी १.३० वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला.त्यानंतर पुन्हा मतदानाचा ओघ कमी होत दुपारी ३.३० पर्यंत ४९.४५ टक्के मतदान झाले. यात पुरुष १३४५७ स्त्रिया १२८२४ मतदार यांनी मतदान केले . दुपारच्या सत्रानंतर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५७.१२ टक्के मतदान झाले. यात पुरुष १५६९७ स्त्रिया 1 १४६५५ इतर १ एकूण ३०३५३ मतदार यांनी मतदानाचा हक्क बजाविला.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी विजयदुर्ग, पुरळ हुर्षी या मतदान केंद्रावर भेट देऊन पहाणी केली. यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार रमेश पवार,बापर्डे मंडळ निरीक्षक विनायक शेट्ये निवडणूक ऑपरेटर बाजीराव काशीद, कोतवाल प्रणित सावंत उपस्थित होते. जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणूक मतमोजणी सोमवार दि ९ फेब्रुवारी रोजी स.१० वाजले पासून देवगड तहसीलदार कार्यालय येथे होणार असून त्यासाठी ११ टेबले द्वारे ९ फेऱ्यामधून ही मतमोजणी होणार आहे. त्या करीता विशेष मतमोजणी कक्ष तयार करण्यात आला.