जगातील टॉप हॉस्पिटलच्या यादीत ‘एम्स’ सहाव्या स्थानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील टॉप हॉस्पिटलची यादी ब्रांड फायनान्सने जारी केली आहे. या यादीत एकूण 250 हॉस्पिटलचा समावेश असून यात हिंदुस्थानच्या ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट आफ मेडिकल सायन्स (एम्स) ला सहावे स्थान मिळाले आहे. 2026 मधील या हॉस्पिटलमध्ये अव्वल स्थान हे जॉन्स हापकिन्स मेडिसिनला मिळाले आहे. दुसरे स्थान ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स एनएचएस फाऊंडेशन ट्रस्ट आणि तिसरे स्थान स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरने पटकावले आहे.

चौथ्या स्थानावर मेन्स जनरल ब्रिगहाम, पाचव्या स्थानी मायो क्लिनिक हेल्थ सिस्टम आहे. तर सहावे स्थान नवी दिल्लीतील एम्सला मिळाले आहे. सातव्या स्थानावर कॅनडातील युनिव्हर्सिटी हेल्थ नेटवर्क आहे. आठव्या स्थानावर क्लीव लॅन क्लिनिक आहे. नवव्या स्थानावर केंब्रिज युनिव्हर्सिटी हॉस्पिटल एनएचएस आहे. तर दहाव्या स्थानावर सिंगापूर जनरल हॉस्पिटल आहे. या यादीत मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरला 13 वे स्थान मिळाले आहे.